मा. मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ३१.०८.२०२४ रोजी VC द्वारे आयोजित सभेतील तातडीने पूर्ण करावयाचे कामकाज.
केंद्र शाळांचे सक्षमीकरण प्रत्येक केंद्र शाळा रोल मॉडेल असावी, या हेतूने सदरली शाळेमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. काय सुविधा असाव्यात (उदा. डिजिटल रूम, लायब्ररी, ऐक्टिव्हिटी रूम, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य इ.) याचा अंदाज आणायला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये मागच्या वर्षी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त शाळांवरून अंदाज करता येईल. त्यानुसार शाळेत काय असावे? प्रत्यक्षात सध्या त्या शाळेमध्ये काय आहे? व प्रस्तावित सुविधांसाठी साधारणता किती खर्च येऊ शकतो? याची अंदाजे रक्कम खालील नमुन्यात समग्न शिक्षाचे इंजिनियर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स व गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने तात्काळ निश्चित करून, दोन दिवसात अहवाल शिक्षणाधिकारी यांनी सादर करावा. ५ सप्टेंबर रोजी मा. मंत्री महोदय याबाबत घोषणा करणार आहेत. करीता माहिती वेळेवर येईल याची नोंद घ्यावी
अ.क्र.
केंद्राचे नाव व
पत्ता
यु डायस क्रमांक
सद्यस्थितीत उपलब्ध
आवश्यक वाढीव
वाढीव सुविधा साठी येणारा अंदाजीत खर्च
सुविधा
सुविधा
विद्यार्थ्यां करिता डिजिटल लर्निंग, क्रीडा साधने, क्रीडांगणे, टिचिंग एड्स इ. शैक्षणिक व सर्वांगिण विकासा करिता आवश्यक बाबींचा प्रामुख्याने समावेश असावा.
आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये शाळेत टी.व्ही. द्वारे गायन, वक्तृत्व, नाटक, क्रीडा विषयक माहितीपट दाखविणे. तसेच किती शाळांमध्ये टी. व्ही. आहेत व किती शाळांमध्ये टी.व्ही. नाही, याची देखील माहिती संकलित करून सादर करावी.
PAT - जिल्ह्यातील सर्व शाळांनी आवश्यक माहिती चॅटबोर्ड वर भरण्याबाबत दिलेल्या मुदतीत कामकाज पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी.
परसबाग निर्मिती - जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्मिती उपक्रम राबविणे बावत कार्यवाही करावी. 100 टक्के शाळांमध्ये परसबाग निर्माण केल्याची खात्री करावी व तशी माहिती संचालनालयास सादर करावी.
महावाचन सर्व शाळांचे महावाचन करिता नोंदणी बाबतचे कामकाज येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांचेवर सोपविण्यात आली आहे. यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विद्याथ्यांचा सहभाग जास्तीत जास्त नोंदविणे बाबत यंत्रणा तयार करुन कार्यवाही करावी.
आधार - आधार व्हेरीफिकेशन / अपडेट विषयक कामकाज सुक्ष्मनियोजन करुन पूर्ण होईल याबाबत दक्षता घ्यावी. यामध्ये प्रामुख्याने इ. 1 ली मध्ये दाखल नवीन विद्यार्थ्यांचे कामकाजावर जास्त लक्ष केंद्रीत करावे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 ऑनलाईन अंतीम झालेल्या शाळांची केंद्रनिहाय तपासणी तसेच अद्याप पावेतो अंतीम माहिती दाखल न झालेल्या शाळांचे कामकाज प्रथम प्राधान्याने पूर्ण करावे.
स्वच्छता मॉनिटर शाळांची नोंदणी सह आवश्यक ती कार्यवाही करावी.
स्काऊट अँड गाईड - वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्काऊट अँड गाईड शाळांमधून कार्यान्वित करणे,
केंद्रशाळा बदल करणे याबाबत यापूर्वी माहिती सादर करण्याचे निर्देश होते. ती माहिती सुद्धा द्यावी.
GR प स्वरूपा डाउनलोड करा.
